सांस्कृतिक गोरेगावात नशेचा बाजार फुल-टू जोमात

प्रतिनिधी: संदिप कसालकर 

सांस्कृतिक गोरेगावात नशेचा बाजार फुल-टू जोमात
गेल्या काही महिन्यात गोरेगावात (प) नशेचा बाजार बेधडकपणे फूल फॉर्मात चालला असून इकडे काही प्रशासन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही ? हाच प्रश्न येथील समस्त नागरिक तथा काही दक्ष नागरिकांना पडला आहे,संपूर्ण परिसरात चरसी,गरदुल्ले,यांचा वावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की सगळीकडे गांजा, चरस, ची नशा करुन सोडलेल्या धुराचा दर्प दरवळलेला दिसून येत आहे

परिसरात गरदुलयांचे हल्ले वाढले
गेल्या काही दिवसांमधे नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकड़ुन (नशेच्या धूंदित) हल्ले करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.याला जबाबदार कोण?असा प्रश्न गोरेगावकर विचारत आहेत.याला कारण ही तसेच आहे,गेल्या काही दिवसात क्षुल्लक वाद किंवा सार्वजनिक ठिकाणी नशा करण्यापासुन रोखले असता हाती लागेल (दगड,लाकुड़,ब्लेड) किंवा इतर जे काही मिळेल त्याने जीवघेणे हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे,त्यामुळे नागरिकात भीतिचे वातावरण पसरले आहे.काही दिवसांपूर्वी बंटी पांचाल आणि सोनू शर्मा नामक युवकांवर क्षुल्लक वादावरून अल्पवयींन गरदुलयानी केलेल्या हल्ल्यात दोन्ही तरुण गंभीर जख्मी झाले होते यापैकी सोनू शर्मा याच्यावर झालेल्या वर्मी घावामुळे त्याच्या पोटातील आतड़ी फाटल्यामुळे कूपर हॉस्पिटल मधे अजूनही जीवन मरणाची लढाई लढत आहे
काही महिन्यांपूर्वी एस वी रोड येथील एका हुक्का पार्लर मधे नशेच्या धूंदित जोगेश्वरीच्या एका तरुणाचा भीषण खून झाला होता त्याचे नाव सुद्धा पांचाल असेच होते हा निव्वळ योगायोगच म्हणावा लागेल

नशेबाजांचे अड्डे
आझाद मैदान,महाराष्ट्र विदयालय शेजारिल पाण्याची टाकी, जिजामाता नगर येथील मोकळे मैदान,गणेश नगर चा कोपरा,शिवशक्ति इमारतीला लागून असलेले खंडर,यातून कॉलेज परिसर सुद्धा सुटलेले नाहीत संस्कार धाम कॉलेज,लॉर्ड्स कॉलेज येथे तरुणाईला नशेच्या खाईत पडताना आपण पाहू शकतो,
छुप्या पद्धतीने नशा करणारे आता उघड़ उघड़पणे मादक पदार्थांचे सेवन करताना दिसत आहेत.पोलीस वसाहतीं मागील भींतिचा आडोसा घेवून तेथे नशा करण्यासाठी जमलेली जत्राच पहावयास मिळते.तसेच रात्रीच्या अंधारात लैला मजनूँच्या रासक्रीड़ा ही इथे होत असल्याने पर्यायी मार्गाने येथून जात असताना विशेष करुन महिला वर्गाची कुचंबणा होताना दिसते विशेष म्हणजे याच पोलीस वसाहतीत सहायक पोलीस आयुक्तांचे कार्यालय आहे,येथून तीन डोंगरी परिसरात जाण्यासाठी कित्येक वर्षापूर्वीची वाट बंद पूर्वीचे सहायक आयुक्त श्री सुरेश शिंदे यांच्या कार्यकाळात स्थानिकांच्या विरोधाला डावलून बंद करण्यात आल्यामुळे येथे नशे बाजांचा बाजार भरतो असे स्थानिक नागरिकांनी आमच्याशी बोलताना सांगितले.आणि जी वाट काही महिन्यांपूर्वी बंद केली आहे ती पुन्हा सुरु करावी जेणेकरून येथे नशेड़ी जमा होण्यास काही प्रमाणात लगाम लागेल आणि येथील स्थानिक लोकांना विशेष करुन वृद्ध,पेशंट्स,यांना दिलासा मिळेल अशी मागणी होताना दिसत आहे.

उपाय योजना करण्याची गरज
देशाची भावी पीढ़ी पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नशेच्या अधीन होत असल्यामुळे प्रत्येक पोलीस कर्मचारी यांनी सामाजिक भावना जागृत करुन वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करावयास  हवा, काही दिवसांपूर्वी गोरेगाव पूर्वेतिल एका पोलीस निरीक्षक पातळीवर काम करणाऱ्या एका अधिकारी च्या मुलाचा एका रेव पार्टिनन्तर नाहक बळी गेला होता यावेळी हेही सर्वानी ध्यानात घ्यायला हवे.तसेच सर्व सामाजिक संस्थानी सुद्धा गोरेगाव पोलीस स्थानकात चर्चा करुन यावर क़ाय क़ाय उपाय योजना करता येतील याचा सुद्धा अंदाज घ्यायला हवा. आणि जे समाजविघातक हे नशेचा बाजार मांडून रुपये कमावत आहेत त्यांच्यावर कड़क कार्रवाई करुन त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायला हवा,आणि याचे प्रयत्न जेव्हा सुरु होतील त्यावेळी ते पालक ज्यांची अल्पवयिन मूल या नशेच्या आहारी गेली आहेत त्यांच्या आनंदाश्रु मधून जे आशीर्वाद मिळतील ते पोलिसांनाच मिळतील याबद्दल दुमत नाही