जोगेश्वरी येथील बालविकास विद्या मंदिरामध्ये "प्रवेशोत्सव" अगदी उत्साहाने साजरा
प्रतिनिधी: संदिप कसालकर
मोफत पाठ्यपुस्तक वितरण प्रसंगी उपस्थित असलेले डावीकडून श्री. हेगिष्टे, संस्थेच्या उपखजिनदार सौं. सुरक्षा घोसाळकर, संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्री. सहदेव सावंत, स्थानिक नगरसेवक श्री. अनंत (बाळा) नर, प्रशासकीय समिती प्रमुख श्री. एकनाथ दळवी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौं. रश्मी जोशी व इतर मान्यवर
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्याचा हक्क आता कायद्याने मान्य केला आहे.
शाळा बालकांचे भविष्य घडविते सामाजिक विकासात आणि राष्ट्राच्या जडण घडणीत शाळेचे अव्दितीय स्थान मान्य करावेच लागेल. बालकांना शाळेत प्रवेशित करून त्यांना हसतखेळत आनंददायी शिक्षण देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याअनुशंगाने दिनांक १५.६.२०१८ रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेचे वातावरण चैतन्यमय, उत्साहवर्धक करण्यासाठी बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व) च्या प्राथमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून "प्रवेशोत्सव" साजरा करण्यात आला.
त्याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज संस्थेचे उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल चे चेअरमन श्री. सहदेव सावंत, शालेय व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्राधिकरण सदस्य व स्थानिक नगरसेवक श्री . अनंत नर, शालेय प्रशासकीय समिती प्रमुख श्री. एकनाथ दळवी, संस्थेच्या उपखजिनदार तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ञ सदस्या सौं. सुरक्षा घोसाळकर, मुख्याध्यापिका सौं. रश्मी जोशी, शिक्षक व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना खीर देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

