मालाडमधील ऐतिहासिक कमल तलाव नामशेष...

 मालाडमधील ऐतिहासिक कमल तलाव नामशेष..

मुंबई मालाड
प्रतिनिधी:  सुरेश वाघमारे

तलाव संवर्धन करण्यात प्रशासन अपयशी...

मार्वेरोड मालाड (पश्चिम) राठोडीगाव नजिक असलेल्या ऐतिहासिक कमल तलाव पूर्णतः नामशेष झाला असून या तलावातील कमळाची फुल येथील पर्यटकाना आकर्षित करणारे होते. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तलावातील कमळाची झाडं तलावातील साफसफाई न ठेवल्यामुळे कमळाच्या झाडांना ऱ्हास करणारे नवीनच झाडे पाण्याच्या आत मध्ये उगावली आहेत. त्यामुळे पाणी अस्वच्छ होऊन तलावात असलेल्या कमळ ज्याला राष्ट्रीय फुलांची मान्यता आहे त्याचे संवर्धन करणे राष्ट्र हिताचे असताना येथील तलावाकडे राजकीय व प्रशासकीय म्हाडा (मनपा) अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले आहे. 
केवळ तलावाच्या शुशोभिकरणासाठी मिळालेला फंड चार कोटी च्या आसपास मंजूर झालेला असताना हा फंड लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी आपल्या खिशात फंड करण्याच्या खटाटोप करत असताना दिसत आहे.  तलावाच्या चारहिबाजूने  माजी आमदार पी. यु. मेहता यांच्या फंडातून (निधीतून) लादी करण केले होते. ते काम डागडुजी करण्याच्या नावाखाली गेले दोन महिन्या पासून जे सी बी ने उखाडून ते काम पूर्ण न करता केवळ अगदी कासव गतीने काम करत असून, येथील पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना विशेतः वयोवृद्धांना ये जा करण्यास कमालीची कसरत करावी लागत असून नागरिकांचे हाल होत आहेत. 
सदर कामावर केवळ नामधारी चौकीदार ठेऊन काही प्रमाणात टाकलेल्या सामग्रीची देखरेख म्हणून कुठलाही ठेकेदार व कामगार वर्ग आढळून येत नाही . गेल्या काही महिन्यांपूर्वी "पे अँड युज " शौचालय बनवून वापरात आहे या शौचालय व तलावाच्या सुशोभिकरणाचे श्रेय लाटण्यासाठी भाजपा व काँग्रेस च्या लोकप्रतिनिधी मध्ये श्रेय वादाचे राजकारण व होर्डिंग युद्ध चांगलेच रंगले होते मा. खासदार  गोपाळ शेट्टी यांनी आपल्या समर्थकांना घेऊन उदघाटन केले असताना स्थानिक मा.आमदार अस्लम शेख व नगरसेवक विरेंद्र चौधरी यांनी आपल्या समर्थका सह उदघाटन सोहळा केला. यामुळे नेमके जनतेचे दिशाभूल करण्याचे काम झाले. आजतागायत राजदीप इंटरप्रयजेस या ठेकेदाराला दिलेल्या टेंडर नुसार काम होत नसून जीर्ण झालेल्या संवरक्षण भिंतीला थातूर माथूर सिमेंट चा लेप देऊन सदर काम हे निकृष्ट दर्जाचे चालू असून, कुठल्याही सोयी सुविधा अद्याप नागरिकांना उपलब्ध होत नाहीत.
या तलावाच्या सभोवताली दिवस रात्र कपल्स पॉईंट झाला असुन या ठिकाणी गरदुल्ले चा अड्डा बनला असून या परिसरात रात्री दिवसभर नको तो नंगानाच या ठिकाणी चालतो. यामुळे येथील रहिवासीयांना विषेशतः महिलांच्या सुरक्षिततेची काळजी वाढत चालली आहे. नको त्या अवस्थेत मुलं मुली निदर्शनात येतात. यावर प्रतिबंध करण्यात यावा व या  प्राचिनकालीन तलावाच पाविञ अबाधित रहावं व तलावाची डागडूजी करून येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाघमारे यांनी दोन वर्षांपुर्वी मालवणी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला होता. माञ तरीसुद्धा मनपा व पोलिस प्रशासनाने कानाडोळा करत असुन या तलावाचे संवर्धन करण्यासाठी ऐन राजकीय पडघम वाजू लागले  असताना आता कुठे कामास सुरुवात झाली पन तिही अगदी कासवगतीने होत असल्याने् या तलावाचे भविष्य अंधातरी वाटते. होत असलेल्या कामात भ्रष्टाचार होत आहे. ना कुठे इंजिनिअर ना अधिकारी देखभाल करताना दिसत नाही. महत्त्वाचे म्हणजे भाजपा सत्तेवर असताना कमळाच्या फुलांची काळजी घेतली पाहिजे तर घेऊ शकले नाहीत. आपल्या पक्षाचे चिन्ह म्हनुण तरी लोकप्रतिनिधींनी या तलावातील कमलाची झाडांचे संवर्धन करायला हवे होते. पण आज रोजी माञ तलावातील साफसफाई न ठेवल्या मुळे नको त्या झाडांची उत्पत्ती वाढली व तिच झाडे कमळा  च्या फुलांना मारक ठरले. महत्त्वाचे म्हणजे केवळ नावापुरते कमल तलाव राहिले असुन संपूर्ण तलाव नामशेष झाले आहे. यामुळे येथील रहिवासी व पर्यटकांत असंतोष वाढतो आहे या अनमोल ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तलावातील कमळा ची फुल पुन्हा उमलतील काय असा प्रश्न येथील रहिवासी व पर्यटकांना पडला आहे. मालवणीगाव, खारोडीगाव, व राठोडी गाव या तिन गावातील बांधवांनी शेकडो वर्षा पूर्वी श्रमदानातुन हा तलाव बांधलेला आहे, नंतर २००७ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन अवजड व उद्योगमंञी मा.विलासराव देशमुख व सामाजिक न्याय मंञी मा.चंद्रकांत हंडोरे यांनी डागडूजी करून कमल तलाव असे अधिकृत नाव तत्कालीन आमदार    मा.पि.यु मेहता यांच्या अथक प्रयत्नातून बांधलेले होते. नंतर पुन्हा २००९ मध्ये मा.देशमुख साहेब आणि हंडोरे साहेब यांच्या हस्ते सुशोभिकरन करण्यात आले. आता पुन्हा या वर्षी देखील तलाव सुशोभित करण्याचे काम राजकीय श्रेय वादात चालू झाले माञ राजदिप एंटरप्रायझेस या गुत्तेदार (ठेकेदार) यांचा भोंगळ कारभार सुरु  आहे.  या कामाकडे मनपा जानिवपूर्वक डोळे झाक करत असल्याचे हल्लाबोल जनआंदोलनचे प्रमुख सुरेश वाघमारे यांनी सदर कामात वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल.असा इशारा दिला आहे.