स्वारगेट एस टी स्टॅन्ड वर चोरांचा धुमाकूळ
प्रतिनिधी: कृष्णा पत्की
स्वारगेट एस टी स्टँड वर एक चोरांची टोळी बऱ्याच दिवसांपासून सक्रिय झाली आहे. जी प्रवासी शिवनेरी मधे बसल्या नंतर त्यांच्या बँग्स काढून घेतात आणि प्रवासी भांडुप पम्पिंग, दादर, ठाणे येथे उतरल्या नंतर त्यांच्या लक्ष्यात येते. याचा प्रथम शोध नौपाडा पोलीस ठाण्याचे मार्फत घेतला गेला जेव्हा स्वारगेट डेपो चे CCTV फुटेज पाहिले गेले.