सौ. म.टा
नवी दिल्ली:
उत्तुंग व्यक्तिमत्व... सर्वसमावेशक नेतृत्व... अमोघ वक्तृत्वाचे धनी आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताची आण्विक तटबंदी भक्कम करणारे भारताचे माजी पंतप्रधान 'भारतरत्न' अटलबिहारी वाजपेयी यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर असलेल्या वाजपेयींची प्रकृती वयोमानानुसार खालावली होती. मागील ९ आठवड्यांपासून त्यांच्यावर दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्यानं रात्री त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर आज सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. वाजपेयींच्या निधनामुळं अवघा देश हळहळला असून त्यांच्या रूपानं भारतीय राजकारणातील समन्वयी युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
वाजपेयींना एम्समध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गेल्या ३६ तासांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. एम्समधील डॉक्टरांची पथक त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होतं. मात्र वाजपेयींचं शरीर उपचारांना प्रतिसाद नव्हतं. सायंकाळी साडे पाच वाजता एम्स रुग्णालयाने मेडिकल बुलेटिन जारी करत वाजपेयी काळाच्या पडद्याआड गेल्याचं जाहीर केलं.