प्रतिनिधी: संदिप कसालकर
मराठा क्रांती मोर्चाने उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. मात्र या मधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळ या शहरांना वगळण्यात आले असून या चारही ठिकाणी केवळ ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं आंदोलकांनी जाहीर केलं आहे.
मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान बैठकीत हा निर्णय घेण्यात आला परंतु या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन होईल असंही या बैठकीत ठरले. उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, लातूर आणि रायगड आदी ठिकाणी सर्वाधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
