नविदिल्ली दि.7- डीएमके पक्षाचे प्रमुख आणि देशातील सर्वात ज्येष्ठ नेते एम. करुणानिधी यांच्या निधनामुळे तामिळी जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण देशाने राष्ट्रीय एकात्मतेसाठी लढणारा निस्वार्थी लोकप्रिय आणि दूरदृष्टीचा नेता गमावला आहे. एम करुणानिधी हे तामीळी जनतेचे नायक; मास लीडर होते त्यांच्या निधनाने राष्ट्रीय राजकारणात अनेक वर्षे सर्वोच्च स्थानी चमकणारे तारा निखळून पडला आहे अश्या शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी एम करूननिधींना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
तामिळनाडू चे अनेक वर्षे मुख्यमंत्री राहिलेले एम करुणानिधी हे तामिळनाडूतील प्रचंड लोकप्रियता लाभलेले मास लीडर होते. ते विचारवंत आणि लेखक ही होते. त्यांनी द्रविड चळवळ राष्ट्रीय एकात्मतेची दृष्टीने उभारली. त्यांनी नेहमी राष्ट्रीय एकात्मतेला महत्व दिले . दूरदृष्टीने निर्णय घेणारे निस्वार्थ नेते म्हणून तामिळी जनता सदैव एम करुणानिधी यांचे स्मृती जोपासेल असे सांगत ना रामदास आठवलेंनी दिवंगत एम करुणानिधी यांना आदरांजली वाहिली आहे.

Comments
Post a Comment