भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे आणि ओ.बी.सी मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांची चर्चा. विजयभाऊ च्या उपक्रमाचे केले कौतुक
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी.मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ चौधरी यांनी मंगळवार 14 रोजी भा.ज.पा. प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेवून चर्चा केली. विजयभाऊ चौधरी यांनी राबवलेल्या संवाद से संपर्क या अभियानाची माहिती खा.दानवे यांनी जाणून घेतली. तसेच अगामी नियोजनाची माहिती घेवून ओ.बी.सी.मोर्चाच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी भा.ज.पा.ओ.बी.सी.मोर्चा प्रदेश महामंत्री अजय भोळे, विदर्भाचे विभागीय अध्यक्ष सुभाष घाटे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment