किशोर सहकारी पतपेढीचे मालक रामकृष्ण कुटे यांसकडून सभासदांची लाखो रुपयांची फसवणूक

किशोर सहकारी पतपेढीचे मालक रामकृष्ण कुटे यांसकडून सभासदांची लाखो रुपयांची फसवणूक

प्रतिनिधी: संदिप कसालकर 

स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक करणे हा मुळात काही समाज कंटकांचा व्यवसायाचं ठरला आहे यात काही नवीन नाही. पण मुंबईसारख्या शहरात हे खुलेआम करणं तेही पतपेढीच्या नावाखाली हि फार मोठी धक्कादायक घटना आहे. अशीच एक घटना मुंबईतील दादर पश्चिम येथे घडली आहे. श्री नदीम अब्दुल अजीज मेंगलोरवला हा व्यक्ती अगोदर धनदीप फायनान्स नामक कंपनी मध्ये पैसे जमा करण्याचे काम करायचा. परंतु यामधून येणाऱ्या कमिशन मध्ये नदीमचा उदर्निवाह होत नव्हता कारण घरात कमावणारा तो एकटाच असून त्याची आई, वडील, बहीण व दोन मुले त्याच्या कमाईवर अवलंबून होते. मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हावे त्याचप्रमाणे उदरनिर्वाह व्यवस्थित व्हावा यासाठी नदीमने दादर पश्चिम येथील किशोर सहकारी पतपेढी कार्यालयाचे संस्थापक श्री रामकृष्ण कुटे यांची भेट घेतली. रामकृष्ण कुटे यांनी जास्त कमिशनचे देण्याचे तसेच सर्व सभासदांना वेळेत लोन मिळेल असे अमिश दाखवून नदीम याला आपल्या जाळ्यात अडकवले. नदीमने हि संधी जराही न गमावता इतर लोकांनासुद्धा यामध्ये सभासद करून घेतले. पण अज्ञात असणाऱ्या नदीमला कुठं माहित होत कि रामकृष्ण कुटेंनी पसरवलेल्या जाळ्यात तो अडकत जात आहे. किशोर सहकारी पतपेढीच्या समावेश झालेले सर्व सभासद फक्त नदीमच्या बोलण्यावर न चुकता लोन मिळेल या आशेने रोजच्या रोज पैसे देऊ लागले व नदीम रोजच्या रोज न चुकता या सर्व सभासदांचे पैसे किशोर सहकारी पतपेढीत भरू लागला. असे करत करत सभासदांची एकूण ४,१३,५०० एवढी रक्कम जमा झाली. आता वेळ होती ती कर्ज मागण्याची ज्याबद्दल कुटे यांनी सुरवातीला नदीमला आश्वासन दिले होते. २ महिने उलटून गेल्यावर अखेरीस नदीम रामकृष्ण कुटे यांच्याकडे कर्ज कधी मंजूर करणार असे विचारण्यासाठी कुंटेंच्या ऑफिसमध्ये गेला. ऑफिस मध्ये पाऊल ठेवताच नदीमच्या एक धक्कादायक गोष्ट समोर आली व त्यानंतर तो पूर्णपणे हादरून गेला. त्याने पाहिले कि अंबरनाथ, ठाणे, कळवा, विक्रोळी व कांजूरमार्ग या ठिकाणाहून बरेच सभासद रामकृष्ण कुटे यांच्या ऑफिसमध्ये कुंटेंना शिवीगाळ करीत होते व बोलत होते कि कर्ज मंजूर होत नाही तर आमचे पैसे परत द्या.
नदीमने याची सखोल चौकशी केली असता त्याला कळले कि रामकृष्ण कुटे हि व्यक्ती चीटर आहे व त्यांनी ५० हुन अधिक माणसांची आर्थिक फसवणूक केली आहे. तरीही आपल्याला काही माहिती नाही असे दाखवून नदीमने कुटेंशी गोड बोलून भरलेली रक्कम कृपया परत करा अशी कळकळीची विनंती केली. पण नेहमीप्रमाणे कुटेंनी नदीमला फक्त आश्वासनं दिली. १० ते १५ वेळा नदीमने कुंटेंच्या कार्यालयात जाऊन पैशाची भीक मागीतली पण कुटेंनी नेहमीप्रमाणे तारखेवर तारीख देऊन फक्त टाळाटाळ केली. आता नदीम पूर्णपणे ढासळून गेला होता कारण नदीमच्या विश्वासावर पैसे भरलेले सभासद त्याच्या घरपर्यंत येऊ लागले. हळूहळू मैत्रीचे नात्याचे आता शत्रुत्वामध्ये बदल होऊ लागले. ते सर्व सभासद नदीमला शिव्या व धमकी देऊ लागले. पण सर्वांचं भलं करू पाहणाऱ्या नदीम सर्वांच्या हातापाया जोडून सर्व सभासदांना आश्वासनं देऊ लागला. अखेरीस दिनांक १६.०१.२०१८ रोजी नदीम सर्व सभासदांना घेऊन रामकृष्ण कुंटेंच्या माहीम पश्चिम येथील कार्यालयात गेला असता कुटेंनी दिनांक १७.०१.२०१८ रोजी ८८,८०० रुपये चा धनादेश नदीमकडे दिला. तसेच २ लाख रुपयांचे प्रत्येकी १-१ लाख असे दोन धनादेश दिले व उर्वरित रक्कम रुपये १,१०,००० तीन चेक पास झाल्यावर देऊ असे आश्वासन रामकृष्ण कुटे यांनी नदीमला दिले. यामुळे नदीमला काहीसा धीर आला. 
पण शेवटी ती म्हण खरीच आहे कि कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच. रामकृष्ण कुटेंनी दिलेले तिन्ही धनादेश बाउन्स झाले व नदीमवर पुन्हा एकदा संकट कोसळल. नदीमकडे कोणत्याही प्रकारचा पर्याय नसल्याने पुन्हा एकदा नदीमने रामकृष्ण कुटे यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला. नदीम रामकृष्ण कुटे यांच्या कार्यालयात जात असताना कुटे हे नदीमला खालीच भेटले. नदीमने कुंटेंना धनादेश बाउन्स बद्दल विचारले असता शेवटी कुटेंनी धमकी देऊन सांगितले कि "तुमची कसल्याही प्रकारची रक्कम देणार नाही, तुला माझे काय वाकडे करायचे ते कर, माझी ओळख शिवसेना भवनमध्ये आहे. तुम्ही पोलिसात किंव्हा कोर्टात गेले तरी माझे कोणी काहीही वाकडे करू शकत नाहीत. जर पुन्हा माझ्या कार्यालयात पैसे मागण्यास आलास तर तुला गुंडांमार्फत जीवे ठार मारेन." तसेच असेही सांगितले कि तुला खोट्या केसमध्ये अडकवून टाकेन.
नदीम याने सदर घटनेची माहिती माहीम पोलीस ठाणे येथे दिनांक २३.०५.२०१८ रोजी दिली आहे. माहीम पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री सातव सदर घटनेची चौकशी करीत आहेत.