घाटकोपर अशोक नगरमधील शौचालय बंद, नागरिकांची मोठी कुचंबणा
मुंबई प्रतिनिधी: अविनाश माने
घाटकोपर: एकीकडे
मुंबईला हगणदारीमुक्त असल्याचे प्रमाणपत्र मिळते तर दुसरीकडे मुंबईमधील
वस्त्यांच्या शौचालयांच्या दुरवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला
आहे.
घाटकोपर असल्फाजवळील अशोक नगरमधील हिल नंबर 3 येथील सार्वजनिक शौचालय गेले दीड महिने बंद असल्याने नागरिकांची कुचंबणा होत आहे.
अशोक
नगरमधील हिल नंबर 3 येथील राठोड मेडिकलसमोर असलेले 8 पुरूष व 8 महिलांसाठी
असे एकूण 16 शौचकूप असलेले शौचालय गेले दीड महिने प्रचंड दुरवस्थेमुळे बंद
ठेवण्यात आले आहे. येथील लोक वस्ती मोठ्या प्रमाणात असल्याने नागरिकांची
कुचंबणा होत आहे 12 वर्षापूर्वी बांधलेले या शौचालयाचे सर्व शौचकूप तुटले
तसेच छप्पर देखील तुटले गेले होते.
मलनिस्सारण
टाकी पूर्णत भरून गेल्याने सर्व दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावरून
वाहत होते. या शौचालयाची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक समाजसेवक
नितिन गायकवाड यांनी वारंवार स्थानिक नागरिकांनी पालिका एल विभागाचे
सहाय्यक आयुक्त आणी लोकप्रतिनिधी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मागणी केली
होती.
स्थानिक आमदार नसीम
खान यांनी काही महिन्यांपूर्वी यांच्या दुरूस्तीचा नारळ देखील फोडला
होता. परंतु नंतर काही हे अशोक नगर येथील शौचालय दुरूस्त झालेच नाही गेल्या
दीड महिन्यांपासून या शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाल्याने अखेर हे शौचालय
वापरास बंद करण्यात आले या मुळे विभागातील सर्व नागरिकांना पायपीट करून
शौचालयास पैसे देऊन जावे लागत आहे.