बदलापूर विकास दैनिक पेपरचे संपादक श्री जगन्नाथ कामत यांची मावेली चिट फंडद्वारे फसवणूक


मावेली चिट फंडद्वारे वरिष्ठ पत्रकार व बदलापूर विकास दैनिक पेपरचे संपादक श्री जगन्नाथ कामत यांची फसवणूक

प्रतिनिधी: संदिप कसालकर
बदलापूर: जगन्नाथ कामत हे त्यांच्या पत्नी व मुलासह महाराष्ट्र अधिकृत पत्रकार म्हणून व्यवसाय करतात व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदर्निवाह चालतो. श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन हे मावेली चिटफंडचे संचालक म्हणून कार्य करत आहेत. मावेळी चिटफंडचे कार्यालय विठ्ठलवाडी पो. स्टेशनच्या हद्दीत आहे. साधरणतः नोव्हेंबर २०१५ मध्ये कामत यांनी श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांच्या मावेली चिटफंड मध्ये दरमहा २०००० रु मात्र प्रमाणे २५ महिने पैसे गुंतविण्यासाठी खाते उघडले. साधरणतः नोव्हेंबर २०१५ पासून कामत मावेली चिटफंड मध्ये कधी दर महा २०००० रु तर कधी दरमहा १५००० रु या प्रमाणे पैसे भरत होते. त्यावेळी मावेली चिटफंडचे संचालक श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांनी कामत यांना सांगितले कि माहे सप्टेंबर २०१७ मध्ये ५,००,००० रु मात्र देणार त्याप्रमाणे कामत मावेली चिटफंड मध्ये दर महा नियमितपणे पैसे भरत होते.
     माहे सप्टेंबर २०१७ मध्ये कामत यांनी श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांसकडे पैसे मागितले असता त्यांनी कामत यांना वेगवेगळे कारण सांगून पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर कामत यांनी पैश्यासाठी आग्रह धरला असता त्यांनी कामत यांना नोव्हेंबर २०१७ ते डिसेंबर २०१७ यामध्ये १,००,००० रु मात्र, १,२५,००० रु. मात्र, व १,२५,००० रु मात्र,  तसेच १,२५,००० रु मात्र असे एकूण ४ चेक दिले त्यापैकी ३ चेक वटले असून दि. १६/१२/२०१७ रोजीचा १,२५,००० रु मात्र, चा चेक अपुऱ्या शेऱ्यानिशी परत आला त्यानंतर कामत यांनी श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांना वकिलामार्फत नोटीस पाठवून पैसे परत द्या म्हणून विनंती केली परंतु आज उद्या देतो असे सांगून त्यांनी १,२५,००० रु. अद्याप परत दिले नाहीत. 
     मावेली चिटफंडचे संचालक श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांनी स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा व कामत यांचा आर्थिक नुकसान व्हावे या हेतूने विश्वास संपादन करून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे असे कामत यांनी सांगितले. कामत यांनी मावेली चिटफंडच्या ऑफिस मध्ये जाऊन पैशाची वेळोवेळी मागणी केली असता श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांनी कामत यांना धमकी दिली व शिवीगाळ केली. अधिक चौकशी दरम्यान कामत यांना कळले कि श्री वर्गीस आणि श्री विजय चंद्रन यांनी इतर ७० ते १०० सभासदाची देखील आर्थिक फसवणूक केली आहे. सदर गुन्ह्याविषयीची नोंद हि विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये केली गेली असून पोलीस याची सखोल चौकशी करत आहेत.