जोगेश्वरीतील आरजेएमडीएस शाळेचा मार्च २०१८ दहावीचा १००% निकाल, कु. संपदा चंद्रशेखर परब ही शाळेत प्रथम...


जोगेश्वरीतील आरजेएमडीएस शाळेचा मार्च २०१८ दहावीचा १००% निकाल 

प्रतिनिधी: संदिप कसालकर 

शाळेच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शाळेच्या प्रिंसिपल व संस्थेचे पदाधिकारी

      रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई या संस्थेने चालविलेल्या आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल या शाळेचा मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ९३% मार्क्स मिळवून शाळेची विद्यार्थीनी कुमारी संपदा चंद्रशेखर परब ही शाळेत प्रथम आली आहे. कुमारी श्रध्दा  पैठणकर ही ९१ % मार्क्स मिळवून व्दितीय आली आहे.
      तसेच संस्थेने चालविलेल्या बालविकास विद्या मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेचा निकाल ९८.५४ %  लागला असून शाळेने निकालाची परंपरा राखली आहे. शाळेचा ओमकार नांदगावकर हा विद्यार्थी ९५.२०% मार्क्स मिळवून शाळेत प्रथम आला आहे. तर साहील मोरजकर हा विद्यार्थी ९४.२०% मार्क्स मिळवून दुसरा व ऋग्वेद गवस हा ९४% मार्क्स मिळवून तिसरा आला आहे.
      संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. मोतीराम विश्वासराव, उपकार्याध्यक्ष व आरजेएमडीएसचे अध्यक्ष सहदेव सावंत,  उपकार्याध्यक्ष श्री. जनार्दन विश्वासराव, सेक्रेटरी श्री. विश्वनाथ सावंत, कार्यकारीणी सदस्य श्री. अशोक परब, उपखजिनदार सौं. सुरक्षा घोसाळकर, मुख्याध्यापिका सौं.अंचन, प्रिंसिपल सौं. डिंपल,शबनम या सर्वांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.