मुंबई जुहू चौपाटी वर प्लास्टिक पिशव्या व घाणीचं साम्राज्य, समुद्र आम्लयुक्त होण्याची दाट शक्यता
सरकारच स्वच्छ भारत अभियान हे फक्त नावापुरतेच राहिलेलं आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये अगोदर बराच प्रमाणात पैसा खर्च झाला आहे पण अद्याप परिणाम हा कुठे दिसत नाही आहे. मुंबई मधील प्रसिद्ध अश्या जुहू चौपाटीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व इतर घाणीचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. याच घाणीमुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका होतो आहे व त्यामुळे समुद्रातील मासे व इतर जीव मरत आहेत. यामुळे पर्यावरणाला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अप्रत्यक्षरित्या पाहिलं तर यामुळे माणसाच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचत आहे. कारण हेच मासे, खेकडे व इतर समुद्री जीव आपल्या रोजच्या आहारात असतात. मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळे या बीचवर बऱ्याच प्रमाणात लहान मुलांची चहल पहल असते. पण येथील घाणीमुळे या मुलांच्या आरोग्यावरसुद्धा याचा दुष्परिणाम होत आहे. यावर तोडगा हा आपल्या हातात आहे. कारण सरकारबरोबर आपली सुद्धा जबाबदारी आहे कि प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा व कचरा हा फक्त येथे असणाऱ्या कचरा कुंडीतच टाकावा. कारण कुठेतरी याला जबाबदार आपण सुद्धा आहोत. त्याचप्रमाणे सरकारनं लवकरात लवकर यावर कठोर असं पाऊल उचलून येथील फेरीवाले तसेच येथे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. नाहीतर तो दिवस दूर नाही कि हा समुद्र पूर्णपणे आम्लयुक्त होऊन या समुद्रकाठी फक्त मेलेले मासे व इतर जीव दिसतील.





