अंधेरी पूर्व शोभना बिल्डिंग जवळ परिसरात किराणा मालाच्या दुकानात ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक

अंधेरी पूर्व येथील किराणा मालाच्या दुकानात ग्राहकांची सर्रासपणे फसवणूक

मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर 
अंधेरी पूर्व दुर्गासेवा संघ, जिजामाता रोड, शोभना बिल्डिंग जवळ परिसरात एका किराणा मालाच्या दुकानात अगदी सर्रासपणे फसवणूक केली जात आहे. तेथे असणाऱ्या मोजमाप यंत्रात लोहचुंबक लावून अक्षरशः ग्राहकांना चुना लावण्यात येत आहे. जियालाल यादव असं या दुकानदाराचे नाव आहे. गेली बरेच वर्ष जियालाल येथे व्यवसाय करत आहे. या किराणाच्या आजूबाजूला मध्यम वर्गीय लोकांची वस्ती आहे. येथील लोक एका विश्वासाने दैनंदिन जीवनाला लागणाऱ्या वस्तू या दुकानातूल विकत घेत असतात. पण पैश्यांच्या लोभापोटी जियालाल या दुकानदाराने येथील लोकांचा विश्वासघात केला आहे.