महानगरपालिकेच्या शाळेसमोर कचऱ्याचे साठे, मुलांचं स्वास्थ धोक्यात...
प्रतिनिधी: आबासो शेवाळे
विक्रोली (पश्चिम) येथील पार्क साईट परिसरातील वर्षा नगर विभागात असणारी महानगरपालीकेच्या शाळेसमोर कचऱ्याचा मोठा प्रमाणात साठा केला जात आहे. या ठिकाणी डोंगराळ भागातील वास्तव करणाऱ्या असंख्य रहिवाश्यांचा कचरा याच ठिकाणी जमा केला जात आहे. या शाळेत इयत्ता 1 ते 4 या वर्गात शिकणारे सर्व लहान लहान मुलांना या कचऱ्याचा ढीगार्यातून शाळेत प्रवेश करावा लागत आहे. शाळेच्या गेटवरच कचऱ्याचा ढिगारा असल्यामुळे असंख्य डास, माशा व दुर्गंधी या सर्व गोष्टींचा या विद्यार्थाना सामना करावा लागत आहे. महानगरपालिका व प्रशासन या परिसरातील कचऱ्याचा साठा हटवतील का याकडेच विधार्थी व पालक यांचे लक्ष लागून राहिलेलं आहे.
