OLA गाडीच्या वाहनचालकाने घेतला श्वानाचा बळी
मुंबई प्रतिनिधी: अविनाश माने
रस्त्यावर फीरणारे श्वान म्हणजे मोकाट फीरणारी कुत्री अशी धारणा काही मुजोर वाहन चालकांची झाली आहे. असाच प्रकार विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरच्या इमारत क्रमांक ९४ च्या समोर घडली आहे. भाडे घेऊन आलेल्या एका OLA कंपनीच्या वाहन चालकाने इमारत क्रमांक ९४ च्या एका रहिवाश्याला इमारती समोर सोडले व OLA कार गाडी भरधाव चालवायला सुरुवात केली. त्यावेळी रस्त्यावरील कुत्र्यांची पळापळ सुरु झाली.
पण त्या कुत्र्यांना सावरायच्या आधीच त्या ओला गाडी चालकाने एका कुत्र्याच्या पोटावरुन गाडी भरधाव नेल्याने तो कुत्रा जागीच तडफडत गतप्राण झाला. स्थानिक लोकांनी लगेच त्या ठीकाणी धाव घेतली असता त्या ओला गाडी चालकाने कार भरधाव करुन पळ काढला.त्यावेळी स्थानिक लोकांना त्या OLA गाडीचा नंबर सुध्दा घेता आला नाही एवढी भरधाव कार त्या चालकाने पळवली. त्यावेळी त्या निरपराध श्वानाचा अंत्यविधी तेथील रहिवाश्यांनी केला.
स्थानिक लोकांना विचारणा केली असता काही लोकांनी असे सांगितले की कदाचित OLA गाडीच्या वाहन चालकाने मद्यपान केले असावे. ज्या व्यक्तीस ती OLA कार सोडावयास आली होती त्या व्यक्तीनेसुध्दा पुढे येऊन माहिती दिली नाही. याच जागी एखाद्या माणसाबरोबर हाच प्रकार घडला असता तर आतापर्यंत तो OLA गाडी चालक कधीच गजाआड झाला असता. परंतु असे झाले नाही. हीच का आपली माणूसकी. अक्षरे फक्त पुस्तकातच आहेत की मुक्या प्राण्यांवर दया करा.
