दहावीच्या विद्यार्थ्याचा HEART ATTACK ने मृत्यू...

दहावीच्या विद्यार्थ्याचा HEART ATTACK ने मृत्यू

मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर 
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई मधील प्रभादेवी परिसरात राहणार ऋतिक घडशी याचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
ऋतिक दादर भागातल्या शिशुविहार शाळेत शिकत होता. ऋतिकचा दहावीचा आज पहिला पेपर होता. मध्यरात्री अचानक त्याला झोपेत हृदयविकारचा झटका आला. त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच ऋतिक कालबाह्य झाला. त्यामुळे घडशी कुटुंबामध्ये शोककळा पसरली आहे. दहावीच्या परीक्षेच्या तणावाचा धक्का ऋतिक ला बसला असावा असं येथील स्थानिक रहिवाश्यांचे म्हणणे आहे.