दामिनी पथकाच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणार्या फौजदार देवकन्या मैंदाड
प्रतिनिधी: संदिप कसालकर
अंबाजोगाई - पोलिस प्रशासनात महिला अधिकारी म्हणून देवकन्या विठ्ठलराव मैंदाड यांनी आपली वेगळी ओखळ अंबाजोगाईत निर्माण केली आहे. एक धाडसी व डॅशींग अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे. देवकन्या मैंदाड या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून २०१५ साली उत्तीर्ण झाल्या प्रशिक्षणानंतर त्या अंबाजोगाईत रूजू झाल्या अंबाजोगाई येथे त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. गेल्या दोन वर्षापासुन विविध धाडसी कामगिरीतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अंबाजोगाईत रोडरोमिओ त्यांची धास्ती घेतात असा दरारा त्यांनी निर्माण केला आहे. दामिनी पथकात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल पोलिस महानिरिक्षक औरंगाबाद यांनी त्यांना आठवडाभरापुर्वीच विशेष कामगिरीबद्दल सन्मानित केले आहे. तर हरवलेल्या, सोडून दिलेल्या ११ मुलांचा शोध त्यांनी घेतला. या बद्दल मुस्कान पथकाच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांचा जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते सत्कार झालेला आहे. गेल्या २ वर्षापासुन एक महिला अधिकारी म्हणून त्यांच्या उल्लेखनिय कार्याची प्रेरणा नविन तरूणींसमोर प्रेरणादायी ठरणारी आहे.