कल्याणमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांची आत्महत्या

कल्याणमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांची आत्महत्या

प्रतिनिधी: प्रदीप सोनावणे
कल्याण येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि एमसीएचआयचे सदस्य आसिफ झोजवाला यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 
झोजवाला यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. बिल्डर व्यवसायिक असलेले आसिफ झोजवाला भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी होते. कल्याण पश्चिमेतील कल्याण-मुरबाड रोडवर 'राणी मॅन्शन'मध्ये आसिफ झोजवाला राहत होते. सोमवारी रात्री त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. झोजवालांच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महात्मा फुले पोलिस करत आहेत.