कल्याण स्टेशन परिसरात रिक्षावाल्यांचा मनमानी कारभार

कल्याण स्टेशन परिसरात रिक्षावाल्यांचा मनमानी कारभार

प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे 
कल्याण (पाश्चिम) स्टेशन लगत असणाऱ्या रस्त्यावर अवैधरित्या रिक्षावाले रिक्षा उभी करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात अडचणीच करून ठेवत आहेत तसेच जवळच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगर असून या ठिकाणी भिवंडी, पडघा, मुरबाड, उल्हासनगर, पुणे, रत्नागिरी अशा विविध ठिकाणाहून येणाऱ्या बसेसला पण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व त्रासाला प्रवासी व कल्याण स्थानिक रहिवाशी अक्षरशा वैतागले आहेत.