अवघ्या ९ महिन्याच्या बाळाला एका कार चालकाने चिरडले
मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर
जोगेश्वरी पूर्व
अवघ्या ९ महिन्याच्या बाळाला एका कार चालकाने चिरडल्याची घटना समोर येतेय. जोगेश्वरी पूर्व पासून पश्चिमेकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या खाली हि घटना घडली आहे. राजवीर पवार असं ह्या बाळाचं नाव आहे. आज सकाळी ५:३० च्या सुमारास एक कार उड्डाणपुलाच्या दिशेने येत असता उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या एका ९ महिन्याच्या बाळाच्या डोक्यावरून कार गेली असता त्वरित जवळ असलेल्या ट्रॉमा रुग्णालयात या बाळाला घेऊन जाण्यात आले. पण दुर्दैवाने डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले. जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहोचून त्यांनी घटनेचा आढावा घेऊन वाहनचालकाला ताब्यात घेतल आहे.