फेरीवाले मुक्त स्टेशन परिसर हा फक्त कागदोपत्रीच
प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे
डोंबिवली पश्चिम: गेल्या काही महिन्यांपूर्वी महानगर पालिकेने नवीन कायदा अमलात आणून स्टेशन पासून 100 मीटर अंतरात फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली गेली होती. मात्र काही दिवसातच या कायद्याचा भंग करून मोठ्या प्रमाणात डोंबिवली स्टेशन परिसरात अनधिकृत फेरीवाले स्टेशन लागत तसेच स्कायवॉक या ठिकाणी धंदे लावून बसत आहेत. जवळच पोलीस स्टेशन महानगर पालिकेचे कार्यालय असून देखील याकडे दुर्लक्ष का होत आहे. असा प्रश्न स्थानिक व प्रवाशी यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
