सुप्रीम कोर्टाने आधार जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवली...

सुप्रीम कोर्टाने आधार जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवली 

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने आधार जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकरणी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत बँक खाते, मोबाइल फोन आणि पासपोर्टच्या अनिवार्य आधार जोडणीचा कालावधी वाढवण्यात येत असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकाला दिलासा मिळाला आहे. 
आधार जोडणीबाबतच्या याचिकेवर आपला निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने, 'अनिवार्य आधार जोडणीसाठी नागरिकांवर दबाव टाकला जाऊ शकत नाही', असे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.