कोकण विकास सहकारी क्रेडिट सोसायटी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर...

कोकण विकास सहकारी क्रेडिट सोसायटी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर

हल्ली होत असलेले विविध बँकेचे घोटाळे समोर येत असता लोकांचा आता बँकांवरचा विश्वासच उठला आहे. त्यामुळे लोक आता सहकारी क्रेडिट सोसायट्यांकडे धाव घेत आहेत. त्यात जोगेश्वरी पूर्व परिसरात असलेल्या कोकण विकास सहकारी क्रेडिट सोसायटी नामक संस्था ही फारच चर्चेत येत आहे. या पतपेढीने इतर बँकांना तसेच सहकारी पतपेढयांना मात देऊन चांगलीच उभारी घेतली आहे. अन्य बँका व पतपेढींच्या तुलनेने कोकण विकास सहकारी क्रेडिट सोसायटी संस्था ही एकमेव पतपेढी आहे की जी जास्तीत जास्त व्याज दर देत आहे. त्यात फारच सोप्या पद्दतीने लोन देण्याची व्यवस्था या पतपेढीने केली आहे. लहान असो वा मोठा कसलाही भेदभाव न ठेवता सर्वांना समान वागणूक या पतपेढीमधले कर्मचारी देत असतात. त्यामुळे जोगेश्वरी तसेच इतर पट्ट्यातील लोक या पतपेढीकडे आकर्षली जात आहेत. काही दिवसातच संपूर्ण मुंबई मध्ये या पतपेढीच्या प्रत्येक परिसरात शाखा असतील असा विश्वास या पतपेढीचे चेअरमन श्री सखाराम सुर्वे तसेच व्हाईस चेअरमन श्री रामचंद्र बोभाटे यांनी दाखवला आहे.
दिनांक २७/०२/२०१८ रोजी राज्य स्थरीय बँको पतसंस्था पुरस्कार कोकण विकास सहकारी क्रेडिट सोसायटी या संस्थेस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकावर मिळाला आहे. २०१६ ते २०१७ या वर्षासाठी ठेवी ५ ते १० कोटी व उत्कृष्ट कामगिरी बद्दल मा. आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते लोणावळा येथे  पुरस्कार दिला गेला.