विक्रोळी पार्क साइट परिसरातील झोपडपट्टी धारकांचा काळा दिवस
मुंबई प्रतिनिधी:
आबासाहेब शेवाळे
मुंबई विक्रोळी पश्चिम येथील पार्क साइट परिसरातील संदेश विद्यालय पासून ते डोंगराळ भागात मोठा प्रमाणात झोपडपट्टी धारक वास्तव्य करीत आहेत. गेले कित्येक दिवस या रहिवाश्यांच्या विरोध असताना देखील बिल्डरचा मनमानी कारभार चालू असून येथील लोकांची फसवणूक केली गेली आहे.
आज त्यांनी कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता येथील घर तोडण्यास सुरवात केली आहे. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा चालू असताना या नराधमाच्या अश्या मनमानी कारभाराला येथील स्थानीक रहिवाशी अत्यंत नाराजी व्यक्त करीत आहेत. येथील स्थानिक नगरसेवक व आमदार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत असे स्थानिक रहिवाश्यांकडून व्यक्त केले जात आहे.
