माजी खासदार यांचा भरणार आज जनता दरबार...


मुंबई प्रतिनिधी: श्री संदिप कसालकर

माजी खासदार श्री गुरुदास जी कामत हे दिनांक ९ ते १२ फेब्रुवारी रोजी विभागामधील नागरिकांना होणाऱ्या असुविधा व त्यांच्या समस्यांच निरसन करण्यासाठी भेटीला येणार आहेत. यामध्ये जोगेश्वरी विभागामधील समाजसेवक श्री पुरुषोत्तम जळगावकर (काँग्रेस कार्यकर्ता) यांनी पुढाकार घेतला असून ते विभागामधील असणाऱ्या पानी, ड्रेनेज, आरोग्य सेवा, वाहतुकीच्या समस्या, महिलांची सुरक्षितता तसेच चाळी व् इमारतीच्या पुनर्विकासासंबंधितच्या तक्रारी लेखी स्वरूपात श्री गुरुदास जी कामत यांच्या समोर मांडणार आहेत. प्रत्येक तक्रारींच निरसन होणार असा विश्वास श्री गुरुदास जी कामत यांनी जनतेला दिला आहे.

:स्थळ:
श्री साईलीला उद्यान
पटेल टेरेस समोर, पंपहाऊस, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३.

रहा सतर्क आमच्या AIJ Mumbai Android App बरोबर
ताज्या बातम्यांसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा...

https://drive.google.com/open?id=1pkEgqBK6UzVqk0l53jKAWraYfopx1TuT