घाटकोपरचा श्रेयस सिग्नल प्रवाश्यांसाठी त्रासदायी, कुठल्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता...


मुंबई प्रतिनिधी: आबासाहेब शेवाळे (AIJ News - Vikroli)


        मुंबई घाटकोपर पश्चिम येथील लाल बहादूर शाश्त्री मार्गावर असणाऱ्या श्रेयस सिग्नल या ठिकाणी पादचार्यांसाठी भुयारी मार्ग किंवा पादचारी ब्रिज नसल्यामुळे येथील स्थानिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठी 15 ते 20 मिनिट वेळ लागतो त्यातल्या त्यात आपला जीव मुठीत घेऊन रास्ता क्रॉस करावा लागतो. कुठल्याही क्षणी अपघात होण्याची हुरहूर लागलेली असते.
      या ठिकाणी अंधेरी लिंक रोड वरून येणारी तसेच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे तसेच ठाणे, कुर्ला, घाटकोपर स्टेशन अमृत नगर या ठिकाणहून येणाऱ्या सर्व वाहनांची कोंडी याच ठिकाणी होत असते
      जवळच स्थानिक नगरसेवक व आमदार यांचे निवासस्थान असून देखील याकडे दर्लक्ष का होत आहे असे येथील स्थानिक प्रवाशांकडून वर्तवले जात आहे.