मुंबई प्रतिनिधी: अनिल सकपाळ
मुंबईतील
अग्नितांडव काही केल्या थांबन्याचे काही चिन्ह दिसत नाही.काही
महिन्यांपासून आग लागन्याच्या घटनेत वृद्धि झालेली पहायला दिसून येत आहे
यात मानवी चुका कारणीभूत आहेत का ? याचा तपास होइलच
पण
काल रात्रि मात्र दोन वेगवेगवेगळ्या ठिकाणी आग लागून जीवित हानि झाली
आहे.काल मध्यरात्रि अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल एस्टेट मधे इंडिया वन
कंपनीला आग लागून प्रदीप विश्वकर्मा या कामगारचा आगीत होरपळून मृत्यु झाला
तर दुसऱ्या एका घटनेत नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर ३ मधे एका दुकानाला आग
लागून माय लेकिंचा दुर्दैवी अंत झाला आहे.श्वास गुदमरल्याने मृत्यु
झाल्याचे सांगण्यात येत आहे.ही घटना अंधेरीतील आगिच्या केवळ दोन तासांच्या
अंतराने घडली असून 'शॉर्ट सर्किट' हेच कारण असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे
येत आहे.
