दिवसाढवळ्या चैन स्नैच करणारा सापडला नागरिकांच्या तावडीत
प्रतिनिधी : अनिल सकपाल
ठाणे
सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी चैन स्नैच करणाऱ्या भुरट्या चोरांची हिम्मत आता भरदिवसा करण्याइतपत झालेली आहे. अशीच एक घटना ठाणे शहरात दिसून आली. येथील खोपट विभागातील फ्लावर वैली सर्विस रोड येथून एका ज्येष्ठ नागरिकाची सोन्याची चैन हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जागरूक नागरिकांनीच त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. या चोरट्याला पकडण्यात नागरिकांनी हि हिम्मत दाखवली ती नक्कीच कौतुकास्पद आहे.
आपल्या अवतिभवती सुद्धा आपणा सर्वांच्या देखत विनयभंग, अपघात, गुंडगिरी होतच असते. तेव्हा धाडस करुन गुंड प्रवृतिच्या लोकांना अटकाव केला तर नक्कीच काही प्रमाणात गुन्हे कमी प्रमाणात घड़तील पण अर्थातच पोलिसांनीही जनतेला सहकार्य करावे हीच सामान्य नागरिकांची अपेक्षा असते.
