मुंबईत आगीचं थैमान
मुंबई प्रतिनिधी: प्रदिप सोनावणे
अंधेरी पूर्व
मुंबईत दिवसेंदिवस आग लागण्याचं प्रमाण हे फारच वाढल आहे. दर दोन दिवसांनी आग लागण्याच्या घटना ऐकू येत आहेत. पण याला कुठेतरी जबाबदार ही जनताच आहे.
आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अंधेरी पूर्व महाकाली परिसरात फासोस फूड सर्विस नामक दुकानाला गॅस गळतीमुळे आग लागली आहे. फासोस फूड सर्व्हिस शॉप येथे विविधप्रकारचे फूड तयार करून विक्री करते.
सदर इमारतीला महानगर गॅसची पाईपलाईन सुद्धा दिली गेली आहे. तरी सुद्धा या फासोस फूड शॉप AEOS PUREGAS नामक कंपनीचे सिलिंडर वापरत आहे. त्याचप्रमाणे सिलेंडर ठेवण्यासाठी अवैधरित्या इमारतीच्या बाहेरील पॅसेज सुद्धा वापरला आहे. लोखंडी कुंपण बनवून त्या मध्ये सिलेंडर ठेवले जात आहेत. 4 सिलेंडर ठेवण्याची क्षमता असतानाही 6 सिलेंडर ठेवले जात आहेत. याशिवाय आतील गरम हवा बाहेर जाण्यासाठी जी चिमनी लावली आहे ती सुद्धा त्याच्यावरच लावली आहे. चिमनी वाटे बाहेर येणारी गरम हवा त्या सिलेंडर वर पडून त्यातील गॅस गळतीमुळे आग लागली आहे त्याचप्रमाणे अग्निशामक दलाकडून कोणत्याही प्रकारची फासोस फूड शॉपला अद्याप परवानगी मिळालेली नाही असे तेथील समाजसेवक श्री सुनील मळेकर यांचे मत आहे. घटनास्थळी M.I.D.C. पोलिस स्टेशनचे API श्री राऊत पोहोचले असून त्यांनी सदर घटनेचा आढावा घेतला आहे. वेळीच अग्निशामकाचे जवान आल्यामुळे कोणतीही मनुष्यहानी व वित्तहानी झालेली नाही.
