गळफास घेऊन आत्महत्या...


गळफास घेऊन आत्महत्या 

मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर
जोगेश्वरी पूर्व
आज दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी 12:15 वा. चे सुमारास भूषण राजेश वाघ (वय 28 वर्षे) नामक मुलाने लालू भैय्या चाळ, अंबिका नगर, जोगेश्वरी पूर्व, मुंबई याने राहत्या घरच्या पोटमाळ्यावरील लोखंडी अँगल ला रशी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यास ताबडतोब ट्रॉमा केअर रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास तपासून 12.50 वा. दाखलपूर्व मयत घोषित केले. आत्महत्येचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप कळलेलं नाही आहे. त्यासाठी पोलिसांचा अधिक तपास चालू आहे.