कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या लुटारूंना पकडणार...

अरुण जेटली - कोणत्याही परिस्थितीत बँकेच्या लुटारूंना पकडणार  

नवी दिल्ली:  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की बँकांच्या लुटारूंना कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाणार नाही. अरुण जेटली यांनी म्हटले आहे की, सरकार बॅंकांबरोबर झालेल्या सर्व फसवणूक व घोटाळ्यांविरूद्ध कठोर कारवाई करणार आहे. अर्थमंत्री म्हणाले की या प्रकरणात दोषी असलेल्यांना शिक्षा हि मिळणारच आहे. ते म्हणतात की बँकेचे पैसे लुटून देश सोडणाऱ्या लोकांना शिक्षा देऊन अशा प्रकारचे उदाहरण सादर करण्याची आवश्यकता आहे.

जेटली यांनी असही म्हटलं आहे की बँक फसवणूक प्रकरणात पर्यवेक्षी संस्थांना स्व-विश्लेषण करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी बँक व्यवस्थापनांनाही  लक्ष्य केले आणि म्हणाले बँकेच्या व्यवस्थापनांच्या लापरवाहीमुळे ही घटना घडली आहे.