पत्रकाराच्या कुटुंबाची निर्घृण हत्या
नागपूर प्रतिनिधी
दिवसेंदिवस पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. पण आता पत्रकारांबरोबर त्यांच्या कुटुंबालादेखील टार्गेट केलं जात आहे. अशीच एक घटना नागपूर शहरात घडली आहे.
नागपूर शहरातील 'नागपूर टुडे' नामक वेबसाईट मध्ये काम करणारे क्राईम रिपोर्टर श्री रविकांत कांबळे यांच्या आई (उषा कांबळे - वय ६०) व मुलगी (राशी कांबळे - वय १८ महिने) यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
या दोघीही शनिवार सायंकाळ पासून बेपत्ता होत्या. पवनपुत्र मध्ये दीघोरी परिसरात हे कुटुंब स्थायिक होते. शनिवारी सायंकाळी उषा या त्यांच्या नातीला घेऊन शाहू नामक व्यक्तीच्या किराणा मालाच्या दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या दिवशी घरी न परतल्यामुळे या बाबतची तक्रार तेथील स्थानिक पोलीस स्टेशन ला कळविण्यात आली.
पोलिसांच्या चौकशी दरम्यान कांबळे यांच्या निवासस्थानापासून 3 कि.मी. अंतरावर असलेल्या विहिरगांव येथील पुलालगतच्या नाल्यात दोंघांचे मृतदेह एक पोत्यात सापडले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राशी आणि उषा यांना गळा आवळून मारण्यात आले होते. असे समजले जाते की या दोघांचा प्रथम शाहू नामक व्यक्तीच्या घरामध्ये खून करण्यात आला व त्यानंतर त्यांच्या शरीराला नाल्यात टाकण्यात आले होते. तथापि, पोलिसांनी अजूनही सिद्धांताची पुष्टी केलेली नाही.