डुक्कर तस्करांना अटक जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलीसांनचे मोठे योगदान

डुक्कर तस्करांना अटक जोगेश्वरी पूर्व मेघवाडी पोलीसांनचे मोठे योगदान 

जोगेश्वरी पूर्व 
मुंबई प्रतिनिधी: संदिप कसालकर

कत्तल करण्याच्या उद्देशाने नेण्यात येणाऱ्या 10 डुकरांची सुटका करण्यात मेघवाडी पोलीसांना रविवारी पहाटे यश मिळाले. या प्रकरणी चौघा तस्करांना अटक करण्यात आली.
कत्तल करण्याचा उद्देशाने डुक्कर घेऊन जाणार असलेल्याची माहीती शनिवारी मेघवाडी पोलीसांना एका प्राणीप्रेमी संघटनेकडून मिळाली. त्यानुसार जोगेश्वरी (पूर्व) जेव्हीएलआर परिसरात स्मशानभूमीच्या समोर पोलीस उपनिरीक्षक बि. शिंदे आणि त्यांच्या नाकाबंदीच्या टीम ने रविंद ठोंबरे, सपकाळे, ओवळे या कॉन्स्टेबल्स ने तीन चाकी टेम्पो अडविला व झडतीच्या दरम्यान त्यात तीन मृत आणि 10 जिवंत डुक्कर पोलीसांना आढळले. त्या नुसार त्या तीघांची चौकशी करून त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
कोणालाही टेम्पोवर संशय येऊ नये म्हणून हस्तगत करण्यात आलेल्या जिवंत डुकरांना बेदम मारहाण करून त्यांचे पाय आणी तोंड घट्ट बांधण्यात आले होते. 
प्राणीमीत्र संघटनेने या प्रकरणी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार विकास गायचंद 24, दिपक सारकर 27, विजय गायचंद 32, आणी गुडप्पा धोत्रे 65, या चौघांच्या मेघवाडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ते सर्वजण मालाडच्या मालवणी परिसरातील राहणारे आहेत. त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.