नोकरदारांना मोठा झटका
नोकरी करणार्यांना सरकारने मोठाच झटका दिला आहे. सरकारने EPF वरचा व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. EPF मागील आर्थिक वर्षात ८.६५ टक्के दराने व्याज देत होती. तर आता व्याज दर कमी करून ८.५५ टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाला ५ करोड PF धारकांना झटका लागणार आहे. काय हेच अच्छे दिन आहेत का ? अजून पुढे काय काय सोसावं लागणार आहे असा प्रश्न नोकरदारांना पडला आहे.
