मुंबई प्रतिनिधी : संदिप कसालकर
बेस्ट मध्ये जवळपास ४५० खासगी बस भाड्याने घेण्याच्या विषयावरून उसळलेला वाद हा औद्योगिक न्यायालयात पोहोचला. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये असा कर्मचाऱ्यांना आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन करून बेस्ट कर्मचारी समितीने आज मध्यरात्रीपासून होणारा संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.