व्यवसायात अपयशामुळे पती ने केला संपूर्ण कुटुंबाचा अंत...

व्यवसायात अपयशामुळे पती ने केला संपूर्ण कुटुंबाचा अंत...

मुंबई प्रतिनिधी: अनिल सकपाळ

व्यवसायात अपयशामुळे पती ने केला संपूर्ण कुटुंबाचा अंत...

 
Pune
पुणे - येथील शहराच्या उत्तमनगर परिसरातील एका उद्योजकाने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून, स्वत: गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून, प्राथमिक दर्शनी व्यवसायातील अपयशामुळे त्याने हे कृत्य केल्याचे समोर येत असून, उत्तमनगर पोलीस तपास करत आहेत.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नीलेश सुरेश चौधरी (वय ३९), असे त्या उद्योजकाचे नाव असून,पत्नी नीलम नीलेश चौधरी (वय ३४), मोठी मुलगी श्रावणीनीलेश चौधरी (वय.१०) आणि लहान मुलगी श्रेया नीलेश चौधरी (वय.७ सर्वजण रा.पोकळेनगर, शिवणे, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या चौघांची नावे आहेत. याबाबत उत्तमनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.

काल शुक्रवार (दि.१६) रात्री आठ वाजता सदरील घटना उघडकीस आली. मयत निलेश चौधरी राहत असलेल्या मोरे पेट्रोल पंपामागील मानस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील, त्यांच्या सदनिकेत एवढी रात्र झाली तरी घरातील दिवे कसे लावले नाहीत, म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावले असता, निलेशचा मृतदेह हॉल मध्ये फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. यावेळी नागरिकांनी तातडीने पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली असता, आतील बेडरूम मध्ये मयत निलेश याची पत्नी नीलम आणि श्रावणी, श्रेया या दोन्ही मुलींचे मृतदेह पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ चौघानाही ससून रुग्णालयात हलवले असता, रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने घोषित केले.

मयत नीलेश याचा नांदेड औद्योगिक वसाहतीत प्लॅस्टिक मोल्डिंगचा व्यवसाय होता. मात्र तो मितभाषी असल्याने त्याच्यावर काही कर्ज होते का, त्याला कोणता तणाव होता का, याबाबत अधिक माहिती कोणाला फारशी नव्हती. त्यामुळे निलेश’ने हे कृत्य का केले याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून, पोलीस तपास करत आहेत.

मुळचा उत्तमनगर शेजारील कोपरे गावचा रहिवासी असलेला निलेश चौधरी कुटुंबियांसह शिवण्याच्या पोकळे नगर मध्ये घेतलेल्या सदनिकेत पत्नी आणि मुलींसमवेत राहत होता. त्याची मोठी मुलगी श्रावणी पाचवीत तर छोटी मुलगी श्रेया दुसरीत शिकत होती. तर पत्नी नीलम या कोपरे गावात जाऊन मुलांची शिकवणी घेत होत्या. पूर्ण परिवारावर निलेश याचे जीवापाड प्रेम होते. मुलींना विशेष प्रेम लावणाऱ्या निलेश’ने माझ्या पश्चात माझ्या परिवाराचे कसे होईल, या विवंचनेतून हे कृत्य केले असावे असा अंदाज परिसरातील नागरिक व्यक्त करत होते. मात्र पूर्ण परिवाराच्या निधनाने पूर्ण शिवणे, उत्तमनगर, कोपरे आणि कोंढवे धावडे परिसरावर शोककळा पसरली असून, नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.