मुंबईत प्रेमी युगलांचे फोटो व चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळी सक्रीय...




मुंबई प्रतिनिधी: अविनाश माने

मुंबईत प्रेमी युगलांचे फोटो व चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळी सक्रीय झाली आहे.
पवई तलाव भागात प्रेमरसात मग्न असणाऱ्या प्रेमी युगलांचे फोटो आणि चित्रफिती काढून सोशल मिडियामार्फत व्हायरल करणारी टोळीच या भागात सक्रीय झाली आहे. मुंबईतील युथ पॉवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हातात या चित्रफिती पडताच, त्यांनी पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल फोपळे यांची भेट घेवून याबाबत लेखी निवेदन देत चित्रफिती व्हायरल करणाऱ्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
विविध सोशल माध्यमांवर पवई तलाव भागातील प्रेमीयुगलांची अश्लील वर्तनाचे व्हिडिओ वायरल झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पवई तलाव परिसरात येणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या भविष्यासह कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
व्हायरल होणाऱ्या चित्रफितींचा फायदा घेवून, कोणतेही गैरकृत्य घडू शकण्याची शक्यता नाकरता येत नाही, त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर व्हायरल करणाऱ्या लोकांचा शोध घेवून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी संस्थेचे मुक्ताराम कांबळे यांनी यावेळी केली.
तरुणांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेतर्फे परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत. तसेच येथे गस्त घालणाऱ्या पूर्णवेळ सिक्युरिटी गार्डसच्या नियुक्ती कराव्यात अशा प्रकरच्या मागण्यासुद्धा नागरिकांकडून होत आहेत.