मुंबई प्रतिनिधी: अनिल सकपाळ
डोंबिवली मधील उसरघर येथील एका बांधकामच्या तळमजल्याला भिषन आग लागली. बांधकामाचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच इमारत बांधकामासाठी केमिकल्सचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच हि भीषण आग लागली असं तेथील स्थानिक रहिवाश्यांचं म्हणणं आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या दोन तासांपासून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते.