पाकिस्तानच्या मिथी शहरात धर्मांधांकडून हिंदूंच्या हत्या, धर्मांतर आणि पिटाळून लावण्याच्या घटनांत वाढ
पाकिस्तानमधील हिंदुद्वेष !
खरेतर बहुसंख्यांक हिंदूंच्या भारत देशातील सरकारने अन्य देशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी नैसर्गिकरित्या कार्य करायला हवे होते; परंतु निधर्मी भारतातील राज्यकर्ते हेे कधीच करणार नाहीत. त्यामुळे आता देशभरातील हिंदु संघटनांनीच संघटित होऊन यासाठी कार्य करणे आवश्यक आहे !
मिथी – पाकिस्तानच्या थारपरकार जिल्ह्यातील हिंदुबहुल मिथी शहरात दिलीप कुमार आणि चंद्र कुमार या दोन हिंदु बंधूंची धर्मांधांनी नुकतीच दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे या शहरात हिंदूंमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या शहरात हिंदूंच्या हत्या करणे, धर्मांतर घडवून आणणे आणि त्यांना पळून जाण्यास भाग पाडणे इत्यादी प्रकारांत सध्या वाढ झाली आहे. ‘जमात-उद्-दवा’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचा यामध्ये हात असल्याचा संशय आहे.
सौजन्य - दैनिक सनातन प्रभात