ज्येष्ठ पत्रकारावर लोकलमधील गुंडांकडून मारहाण,
भारतीय पत्रकार संघ (AIJ) कडून निषेध
मुंबई :
ज्येष्ठ पत्रकार सुधीर शुक्ला इंडिया टीव्ही मध्ये कार्यरत आहेत. मीरारोड ते अंधेरी लोकल प्रवास करताना १० ते १५ जणांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
आमच्या प्रतिनिधी कढून मिळालेल्या माहितीनुसार, सुधीर शुक्ला हे मीरारोड पासून अंधेरी लोकल प्रवास करताना त्यांना लोकलमधील एका गुंडप्रवृतीच्या ग्रुपने लोकलमध्ये चढण्यास दिले नाही. पण ऑफिसमध्ये उशीर होईल या ताणामुळे कसेतरी ते गाडीत चढले. त्यानंतर लोकलमध्ये असलेल्या गुंडानी त्यांना नको नकोत्या घाणेरड्या शिव्या दिल्या आणि त्या गुंडानी शुक्ला यांना मारहाण कऱण्यास सुरूवात केली. अंधेरी मधील जीआरपी पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय पत्रकार संघ (AIJ) या असोसिएशने या घटनेचा निषेध नोंदवला असून कठोर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.
